Advertisement

बेंबाळ येथे मोफत कर्करोग तपासणी शिबिर! (६ जून २०२५)

 नांदगाव (ता. मुल ) – दिनांक ०६ जून २०२५ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, बेंबाळ येथे HCG Cancer Hospital, Nagpur यांच्या तर्फे एक भव्य विनामूल्य कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात नागपूर येथील HCG रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून विविध प्रकारच्या कर्करोगांची तपासणी करण्यात येणार आहे.

या शिबिरात प्रामुख्याने मुख, गर्भाशय मुख व स्तन कर्करोग यांसारख्या प्रकारांची तपासणी केली जाणार आहे. नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे शिबिर सर्वांसाठी विनामूल्य असून, कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे लवकर निदान होण्यासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. त्यामुळे बेंबाळ तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी या उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या