दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
📍 बिनबा वॉर्ड, वरोरा | 23 जून 2025
🟥 दारूच्या नशेत मुलाचा थरार; वडिलांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
वरोऱ्यातील बिनबा वॉर्डमध्ये सोमवारी रात्री एक ह्रदयद्रावक घटना घडली. जुन्या शेतीच्या वादातून दारू पिऊन आलेल्या मुलाने वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव ताराचंद उर्फ दारासिंग बाबूसिंग बैस (वय 62) असून, आरोपी मुलगा मुन्ना उर्फ संग्रामसिंग ताराचंद उर्फ दारासिंग बैस (वय 30) याला पोलिसांनी अटक केली आहे.
🔍 घटनेचा तपशील
मिळालेल्या माहितीनुसार, बैस कुटुंबीयांची वडिलोपार्जित शेती वरोऱ्याजवळील मोवाडा येथे आहे. घरात सतत शेतीच्या वाटपावरून वाद होत असत. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मुन्ना बैसने दारूच्या नशेत वडिलांशी वाद घातला. रागाच्या भरात त्याने धारदार शस्त्राने वडिलांवर वार केले. गंभीर जखमेमुळे ताराचंद बैस यांचा जागीच मृत्यू झाला.
🚓 पोलीस कारवाई व तपास
घटनेची माहिती मिळताच वरोरा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास पथक पाठवले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. आरोपीला घटनास्थळीच अटक करण्यात आली असून, त्याच्यावर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, अति. पोलिस अधीक्षक रीना जनबंधू आणि प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी नाओमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निशिकांत रामटेके करत आहेत.
⚖️ कोठडी सुनावणी
मंगळवारी, २४ जून रोजी आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता ३ दिवसांची पोलिस कोठडी (२६ जूनपर्यंत) सुनावली आहे.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. विनोद बोरसे तर सहायक सरकारी वकील म्हणून अॅड. अनुपमा फाळके काम पाहत आहेत.
📰 — दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
📌 ताज्या व खात्रीशीर बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा
0 टिप्पण्या
Thanks for reading