बाबराळा: खनिकर्म योजनेतील रस्त्याच्या कामात मोठा हलगर्जीपणा! दर्जेदार लाल मुरमाऐवजी विहरीची भिसी वापरण्यात आल्याने नागरिक संतप्त
दरारा 24 तास न्युज नेटवर्क | मुल, जिल्हा चंद्रपूर
बाबराळा गावात खनिकर्म योजनेअंतर्गत बसस्टॉपपासून काही अंतरावर काँक्रिटीकरण रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याच्या साईडबंपरवर बांधकाम नियम धाब्यावर बसवून दर्जेदार लाल मुरमाऐवजी विहरीची भिसी – म्हणजेच नालमटार माती – भरली गेल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पावसाळ्यात ही भिसी चिखलात रूपांतरित होऊन अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते, शिवाय रस्त्याच्या मजबुतीवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
"या प्रकाराची तातडीने चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी," अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
स्थानिक प्रतिनिधी आणि संबंधित विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेणे गरजेचे असून, सार्वजनिक निधीचा गैरवापर थांबवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading