Advertisement

📰 शेतकऱ्यांना दिलासा देणारं पाऊल! कृषी पंपांसाठी विज जोडणी देण्याची आमदार मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी!



📰 शेतकऱ्यांना दिलासा देणारं पाऊल! कृषी पंपांसाठी विज जोडणी देण्याची आमदार मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी!

📍 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | चंद्रपूर, दि. 7 जून

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून न घेता बसणारे नव्हेत आमदार सुधीर मुनगंटीवार! सिंचनासाठी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कृषी पंपांसाठी विशेष वीज जोडणी देण्याची ठाम मागणी केली आहे.

🌾 शेतकऱ्यांचे अर्ज खोळंबले, वीज जोडण्या रखडल्या!
‘बळीराजा कृषी विज माफी योजना’ लागू झाल्यानंतर नव्या वीज जोडण्या थांबवल्या गेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कृषी पंपांसाठी अर्ज करून डिमांड भरली, तरी अद्याप विज मिळालेली नाही. त्यामुळे शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे.

🔋 सौर पंपांची मर्यादा, जलस्तर खोलात
जिल्ह्यात भूगर्भजल पातळी १५० फूटांपर्यंत खाली गेल्याने सौर पंप अपुरे पडत आहेत. पारंपरिक विज जोडणीशिवाय सिंचन शक्य नाही, हे लक्षात घेता मुनगंटीवार यांनी तीव्र मागणी केली आहे.

🧑‍🌾 किसान मोर्चाचा पाठिंबा
भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. बंडू मधुकर गौरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधत मुनगंटीवार यांना निवेदन दिले. त्या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी स्वरूपात ठोस कारवाईची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना हक्काची वीज – तात्काळ आदेश द्यावेत!
“ही समस्या गंभीर आहे. शेतकऱ्यांची वीज जोडणीची कामे तातडीने मार्गी लागावीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत निर्देश द्यावेत,” अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली आहे.

➡️ दरारा 24 तास न्यूज आपल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठाम उभा आहे – तुमच्या हक्कासाठी आम्ही नेहमी सज्ज!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या