📰 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
📅 दिनांक: ९ जून २०२५ | 🕘 वेळ: सकाळी ८.३० ते ९.०० दरम्यान
📍 घटनास्थळ: सावली-मूल मुख्य मार्ग, चिमडा आणि रानसंपन्न हॉटेल दरम्यान
🛑 जंगली डूकरांच्या हल्ल्यामुळे पत्रकार गंभीर जखमी
पत्रकार अमित राऊत यांची प्रकृती चिंताजनक; ICU मध्ये उपचार सुरू
सावली तालुक्यातील चिमडा व रानसंपन्न हॉटेलच्या दरम्यान आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. सावलीहून येणारे स्थानिक पत्रकार अमित राऊत यांच्या दुचाकीसमोर अचानक जंगली डूकरांचा कळप आल्याने ते गाडीवरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या कानामागून रक्तस्राव सुरू झाला.
रस्त्यावरून जात असलेल्या नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच प्रेस क्लबचे विजय सिद्धावार व नासीर खान घटनास्थळी दाखल झाले. अमित राऊत यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, “अचानक समोर आलेल्या जंगली डूकरांमुळे संतुलन बिघडले आणि अपघात घडला.”
जखमी राऊत यांना तत्काळ रिक्षाद्वारे मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करत सलाईन लावले आणि गंभीर रक्तस्राव व आतून झालेल्या मारामुळे त्यांना चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला.
🏥 सध्या मेहरा रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचार सुरू
अमित राऊत यांना ICU मध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते अजूनही अचेत अवस्थेत आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
🙏 संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना
पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय व लोकाभिमुख असलेल्या अमित राऊत यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी जिल्ह्याभरातून प्रार्थना करण्यात येत आहे.
🖋️ प्रतिनिधी: दरारा न्यूज
📸 छायाचित्रे व अपडेटसाठी भेट द्या: www.darara24news.com
📱 ताज्या अपडेटसाठी फॉलो करा: @Darara24News (Facebook, Instagram, Twitter)
0 टिप्पण्या
Thanks for reading