नांदगावच्या सरपंच कुमारी हिमानी वाकुडकर पुन्हा पदावर कायम
🖊 प्रतिनिधी - विजय जाधव, नांदगाव
📌 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
मुल (जि. चंद्रपूर) – मुल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच कुमारी हिमानी वाकुडकर यांना काही महिन्यांपूर्वी घरकुल घोटाळ्याच्या आरोपांमुळे पदावरून हटवण्यात आले होते. या कारवाईनंतर त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले होते.
मात्र, हिमानी वाकुडकर यांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. दोन महिन्यांच्या सखोल सुनावणीनंतर त्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला असून, त्या पुन्हा एकदा सरपंच पदावर बहाल झाल्या आहेत.
नांदगावची गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती
नांदगाव हे गाव नेहमीच राजकीयदृष्ट्या चुरशीचे केंद्रबिंदू राहिले आहे. येथे भाजपचे दोन गट आणि काँग्रेसचे दोन गट सक्रिय असून, दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद दिसून येत आहेत. काही भाजप गट काँग्रेसला पाठींबा देताना दिसत आहेत, तर काही काँग्रेस गट थेट भाजपविरोधात भूमिका घेत आहेत. त्यामुळे गावातील जनतेमध्ये गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगामी निवडणुकीत मोठी चुरस अपेक्षित
येणाऱ्या चार महिन्यांत ग्रामपंचायत निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी सरपंच पद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या ८ ते १० जण सरपंच पदासाठी इच्छुक असल्याची माहिती असून, गावात निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे.
🗳️ आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार?
🌐 या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी वाचा दरारा 24 तास न्यूज नेटवर्क!
[© Darara 24 Taas News Network | सर्व हक्क राखीव]
0 टिप्पण्या
Thanks for reading