Advertisement

बँक ऑफ इंडिया, बेंबाळ शाखेचा भोंगळ कारभार: रिटायर कर्मचाऱ्याच्या हातात संपूर्ण बँकेचा ताबा!

https://youtube.com/@vainganganew?si=qGFGYcRQ1x6IUnxf




बँक ऑफ इंडिया, बेंबाळ शाखेचा भोंगळ कारभार: रिटायर कर्मचाऱ्याच्या हातात संपूर्ण बँकेचा ताबा!

मुल | प्रतिनिधी
बेंबाळ येथील बँक ऑफ इंडिया शाखा सध्या भोंगळ व्यवस्थापनामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. घनश्याम दयालवार नावाचा निवृत्त कर्मचारी आजही या बँकेच्या कामकाजात सक्रीय असून, संपूर्ण बँकेचा कारभार तो एकहाती सांभाळतो, ही धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे बँकेचे अधिकृत अधिकारी आणि कर्मचारी नेमके काय करत आहेत? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


महिला बचत गटांना सातत्याने त्रास

महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले की, एका दिवसात होणारे काम दहा-दहा दिवस लांबवले जाते. त्यांना वारंवार बोलावून मानसिक त्रास दिला जातो. हे फक्त कामाचा अकार्यक्षमता नसून, महिलांच्या वेळेचा आणि आत्मसन्मानाचा अपमान आहे.


व्यवस्थापकाकडून जबाबदारीची टाळाटाळ

या प्रकरणाची बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकर आणि युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पवन भाऊ नीलमवार यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी थेट बँकेच्या व्यवस्थापकासमोर हा प्रश्न उपस्थित केला. परंतु व्यवस्थापकाने ‘दयालवार निवृत्त झालेले आहेत’ असे सांगत जबाबदारीपासून दूर पळण्याचा प्रयत्न केला. यावरून स्पष्ट होते की, व्यवस्थापकाकडे या प्रकारावर उत्तर नाही.


आठ दिवसांची डेडलाईन – अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

सरपंच केमेकर व पवन नीलमवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आठ दिवसांत बँकेतील कामकाज नियमानुसार चालू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल." हा इशारा केवळ शाखा व्यवस्थापकालाच नव्हे तर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील उद्देशून आहे.


सिस्टमच्या ढिसाळपणावर बोट

हे प्रकरण केवळ एका शाखेपुरते मर्यादित नाही, तर हे बँकिंग व्यवस्थेतील अकार्यक्षमता, जवाबदारी टाळणे व वरिष्ठ अधिकाऱ्यांची दुर्लक्ष वृत्ती यांचे प्रतिबिंब आहे. बँकिंग सेवा ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. परंतु, अशा प्रकारच्या प्रकारांमुळे ग्राहकांचा विश्वास उडतो आहे.


दरारा 24 तास न्यूज नेटवर्कमार्फत आम्ही बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवाहन करतो की, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी व शाखेतील कारभार सुरळीत करण्यासाठी पावले उचलावीत.


https://youtube.com/@vainganganew?si=qGFGYcRQ1x6IUnxf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या