🚨
चंद्रपूर (दरारा 24 तास न्युज नेटवर्क) –
दिनांक १६ जुलै २०२५ रोजी प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षक योगिता अभिजीत राणे यांनी विरुर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध तक्रार दाखल केली. सदर दोघांनी ट्रक चालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करताना त्यांच्यावर बनावट पत्रकार असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, लक्कडकोट तपासणी नाक्यावर ड्युटीवर असलेल्या फिर्यादी राणे यांना वॉकीटॉकीद्वारे माहिती मिळाली की, ग्रे रंगाच्या अर्टिका (MH34-BR-1878) मधील दोन इसम ट्रकचालकांकडून पैसे घेत आहेत. त्यांना थांबवून विचारणा केली असता त्यांनी स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत, "आम्ही पत्रकार आहोत, कुठेही फिरू शकतो, काहीही करू शकतो," असे म्हणत उर्मट वर्तन केले.
जेव्हा ओळखपत्र दाखवण्याची विनंती करण्यात आली, तेव्हा त्यांनी टाळाटाळ केली आणि फिर्यादीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याशिवाय, "तुम्ही नोकरी कशी करता, हे पाहतो," अशी धमकी दिली.
याप्रकरणी मयुर अनिल राईकवार व अर्जुन उर्फ सन्नी हरविंद्रसिंह धुन्ना (दोघेही रा. चंद्रपूर) यांच्याविरुद्ध विरुर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२/२०२५ अन्वये कलम २२१, २९६, ३५१(२), ७९ भारतीय न्याय संहिता-२०२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
⛔ नागरिकांना आवाहन – अशा बनावट पत्रकारांच्या धमक्यांना बळी पडू नका!
ट्रकचालक, वाहनधारक, शासकीय व खाजगी अधिकारी यांना आवाहन करण्यात येते की, अशा फसवणूक करणाऱ्यांच्या संपर्कात आल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष ११२ किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. बनावट पत्रकारांकडून खंडणी मागितल्यास त्यांना उघड करा आणि पोलिसांशी सहकार्य करा.
📰 "बनावट पत्रकार" या विषयावर जनजागृतीची गरज – आपल्या अधिकारांची माहिती ठेवा, सावध राहा, सुरक्षित राहा!
सांगावे.
0 टिप्पण्या
Thanks for reading