जूनगावचा पुन्हा संपर्क तुटला! वैनगंगेवर मोठा पूल बांधला, पण नाल्याची दुर्लक्ष!
📝 Vainganga News Live प्रतिनिधी | 10 जुलै 2025
चंद्रपूर जिल्हा – पोंभूर्णा तालुका :
जूनगाव व गंगापूर टोक परिसरातील नागरिकांसाठी पुन्हा एकदा वाहतूक संकट उभं राहिलं आहे. मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीवरून वाहणाऱ्या एका छोट्या नाल्याला पूर आला असून, त्यामधून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. विशेष बाब म्हणजे – या ठिकाणी वैनगंगा नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे, पण त्याआधी येणाऱ्या नाल्यावर पूल मोठा नसल्यामुळे संपूर्ण प्रयत्न अपयशी ठरत आहेत.
प्रमुख मुद्दे:
🔹 वैनगंगा नदीवर मोठा पूल बांधण्यात आला, पण...
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने व प्रशासनाच्या निधीतून वैनगंगेवर तब्बल कोट्यवधी रुपयांचा पूल उभारण्यात आला. मात्र, नदीला मिळणारा एक नाला – जो केवळ ५० ते १०० फूट अंतरावर आहे – तोच पूर आल्यामुळे मोठा पूल सुद्धा उपयोगात येत नाही.
🔹 इंजिनीअरिंगच्या नियोजनाचा फज्जा
स्थानिकांचे म्हणणे आहे की, जेव्हा पुलाचे डिझाइन व इस्टिमेट तयार करण्यात आले, तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण भौगोलिक अभ्यास करणे गरजेचे होते. पूर्वी लहान पूल बुडीत येत होता, म्हणून मोठा पूल उभारण्यात आला – पण त्याच रस्त्यावर पूरस्थिती नेहमी उद्भवणाऱ्या नाल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
🔹 देवळा बुज – वैनगंगा नदीच्या दरम्यान असलेला नाला ठरत आहे अडथळा
जूनगावमार्गे वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी देवळा बुज – वैनगंगा नदीच्या मधोमध असणारा नाला आता तुडुंब भरलेला असून, छोटा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे त्यामुळे सुरक्षेसाठी पोलिसांनी हा रस्ता अडवला आहे. कारण एवढ्या पाण्यातूनही नागरिक जा - ये करू शकतात. कारण गरजा पूर्ण करण्यासाठी जाणे येणे करणे गरजेचे आहे. दुसरी कुठलीच रहदारी व्यवस्था नसल्यामुळे रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे.
🔹 गंगापूर मार्ग सुद्धा बंद!
पूरामुळे गंगापूर कडून जूनगाव जाणारा पर्यायी मार्ग सुद्धा बंद झाल्यामुळे दोन्ही बाजूने संपर्क तुटला आहे. शेतकरी, रुग्ण, विद्यार्थी, कामगार आणि प्रवासी नागरिक यांना याचा फटका बसत आहे.
स्थानिकांची मागणी : नाल्यावर त्वरित पूल बांधावा!
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की वैनगंगेवर जसा भक्कम पूल उभारण्यात आला, तसाच या नाल्यावरही त्वरित पूल बांधण्यात यावा, जेणेकरून येत्या काळात वारंवार निर्माण होणाऱ्या या संपर्क तुटवड्याची समस्या कायमची सुटू शकेल.
प्रशासनाकडून काय पावले उचलली जात आहेत?
या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून अद्याप ठोस पावलं उचलली गेलेली नाहीत. नागरिकांनी मागणी केली आहे की या नाल्याच्या समस्या स्थळ पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात.
Vainganga News Live आपल्या भागातील जनतेच्या आवाजाला वाचा फोडत राहील. प्रशासनाने लक्ष द्यावे व समस्या कायमस्वरूपी सोडवावी, हीच अपेक्षा.
जूनगावचा संपर्क पुन्हा तुटला! लाखोंचा पूल व्यर्थ? प्रशासनाचा हलगर्जीपणा!
📌
मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीलगत असणाऱ्या नाल्याला पूर आला असून, जूनगाव आणि गंगापूर टोक या गावांचा संपर्क तुटला आहे. वैनगंगेवर मोठा पूल बांधला गेला पण नाल्यावर पूलच नाही. हे इंजिनीअरिंग प्लॅनिंगचे अपयश नाही का? सविस्तर पाहा ह्या विशेष रिपोर्टमध्ये.
📌 टॅग्ज
#VaingangaFlood #JoongaonBridge #ChandrapurNews #गंगापूर #जूनगाव #पोंभूर्णा #वैनगंगा #Flood2025 #महाराष्ट्र_पूर_स्थिती #VaingangaNewsLive
0 टिप्पण्या
Thanks for reading