गडचिरोली, ता. १० जुलै (दरारा २४ तास न्यूज नेटवर्क):
अहेरी व भामरागड तालुक्यातील विविध शासकीय योजनांमध्ये होणाऱ्या नियमबाह्य कामे आणि पदभरती प्रक्रियेतील अनियमिततेच्या विरोधात गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयासमोर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी कालपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते.
आज उपोषणस्थळी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार आणि खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी कंकडालवार यांच्या मागण्यांचा गांभीर्याने घेत पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिले. तसेच संबंधित दोषींवर प्रशासनाकडून योग्य ती चौकशी व कार्यवाही करण्यासाठीही ठोस पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.
लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनामुळे समाधान व्यक्त करत अजयभाऊ कंकडालवार यांनी आपले उपोषण तूर्तास मागे घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी खासदार किरसान व आमदार वडेट्टीवार यांनी स्वतः कंकडालवार यांना निंबूपाणी पाजत उपोषण समाप्त केले.
उपस्थितांची मांदियाळी:
या वेळी उपोषणस्थळी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये -
आदिवासी सेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी, ज्येष्ठ नेते अशोक रापेल्लीवार, माजी जि.प.सदस्य अजय नैताम, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविता मोहोरकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन आघाडी जिल्हाध्यक्ष नवघरे, स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी उपसरपंच कार्तिक तोगम, माजी सरपंच अज्जू पठाण, ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे (महागाव), तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवराम पुल्लुरी, नरेश गर्गम, उमेश रामटेके, सचिन पांचार्या, प्रमोद गोडसेलवार, पिंटू मडावी, प्रवीण कोरेत, शोभन कोंड्रावार आदींची उपस्थिती होती.
टिप्पणी: या आंदोलनामुळे अहेरी व भामरागड तालुक्यातील प्रशासनातील अनियमित बाबी पुन्हा एकदा जनतेसमोर आल्या असून, आगामी विधानसभेत या मुद्द्याला महत्त्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
📌 बातमी: दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading