पोंभुर्णा, दि. १० जुलै २०२५:
पोंभुर्णा येथील ज्येष्ठ समाजसेवक आणि आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान आधारस्तंभ तेजराज मानकर यांचे वडील आयु. नरहरीजी मानकर यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते वयाच्या ८५ व्या वर्षी आपल्या अखेरच्या प्रवासास निघाले. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्यक्षेत्रात आणि विशेषतः आंबेडकरी विचारसरणीत एक शून्यता निर्माण झाली आहे.
नरहरीजी मानकर हे अत्यंत शांत, सुसंस्कृत, आणि समाजहितासाठी सदैव तत्पर राहणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. त्यांच्या विचारांचा प्रभाव तेजराज मानकर यांच्या कार्यात प्रकर्षाने दिसून येतो.
त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 11 जुलै 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता नवेगाव मोरे येथील स्मशानभूमीत होणार आहे.
या दुःखद घटनेमुळे पोंभुर्णा परिसरात शोककळा पसरली असून अनेक सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक आणि मित्रमंडळी शोकाकुल अवस्थेत आहेत. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, मानकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले आहे.
🙏 त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
0 टिप्पण्या
Thanks for reading