📰 पोंभुर्णा तहसिल कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी ‘लोकशाही दिन’
पोंभुर्णा (प्रतिनिधी):
सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी व अडचणींवर तत्काळ व न्याय्य कार्यवाही करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार आता तालुका स्तरावरही “लोकशाही दिन” उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अनुषंगाने पोंभुर्णा तहसिल कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी “लोकशाही दिन” आयोजित केला जाणार आहे.
तहसिलदार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी त्यांच्या वैयक्तिक तक्रारी किंवा निवेदने विहित नमुन्यात (प्रपत्र १ अ ते १ ड) दोन प्रतींत, संबंधित कागदपत्रांसह, किमान १५ दिवस आधी तहसिल कार्यालयात सादर करावीत.
📌 महत्वाचे निर्देश:
- अर्ज वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक.
- अर्ज विहित नमुन्यात व संलग्न कागदपत्रांसह असावा.
- न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवाविषयक किंवा अपीलसंदर्भातील प्रकरणे तसेच अंतिम उत्तर दिलेली प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत.
- सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यानंतरच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी लोकशाही दिन पाळण्यात येईल.
येत्या महिन्यातील तालुका लोकशाही दिन तसेच महिला लोकशाही दिन दि. १९ ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालयात राबविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदारांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading