पोंभुर्णा तालुका / जूनगाव :
आजचा दिवस पोंभुर्णा तालुका आणि संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी खास आहे. कारण जूनगावचे सरपंच आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पोंभुर्णा तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांचा आज वाढदिवस आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या या तरुण नेतृत्वाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी तयारीत कोणतीही कमतरता ठेवलेली नाही.
तालुक्यात नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात उत्सवाचे वातावरण
राहुल भाऊ पाल यांचा वाढदिवस सध्या केवळ तालुक्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात जल्लोषात साजरा केला जात आहे. नांदगाव बस स्थानक परिसर, मुख्य चौक, सार्वजनिक ठिकाणे विविध शुभेच्छा फलक, बॅनर, पोस्टर आणि आकर्षक कट-आउट्सनी सजवले गेले आहेत. वातावरण एखाद्या उत्सवासारखे भासते आहे.
त्यानंतर सोशल मीडियावरही शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे. ‘राहुल भाऊ अमर रहे’, ‘जनतेचा नेता राहुल भाऊ’ अशा घोषणा व संदेशांनी फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशा सर्व माध्यमांवर ट्रेंड सुरु आहे. त्यांच्या चाहत्यांचा वर्ग मोठा असून, त्यांच्यावरचा प्रेमाचा वर्षाव हा खऱ्या अर्थाने पावसासारखा अनुभवाला येत आहे.
राजकीय वारसा आणि नवे नेतृत्व
राहुल भाऊ हे माजी सरपंच आणि भाजप नेते स्वर्गीय काशिनाथ भाऊ पाल यांचे सुपुत्र असून, त्यांनी आपल्या वडिलांचा सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे नेला आहे. त्यांचे राज्याचे माजी अर्थमंत्री व विद्यमान आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच आमदार देवराव भोंगळे यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत.
सामाजिक आणि विकासात्मक कार्यात अग्रेसर
राहुल भाऊ पाल यांनी आपल्या कार्यकाळात गाव विकासासाठी भरीव कामगिरी बजावली आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा अशा मूलभूत सेवा पुरवण्यावर त्यांचा भर राहिला आहे. विशेषतः वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाच्या भूमिपूजनासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. आज त्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे आणि भविष्यात या परिसराला मोठा फायदा होणार आहे.
जनसेवेची निष्ठा आणि युवकांमध्ये लोकप्रियता
सामाजिक कार्यातही राहुल भाऊ कायम पुढे राहतात. गरजूंना अन्नधान्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आरोग्य शिबिरे, आणि अपघातग्रस्तांना मदत अशी विविध कार्ये त्यांनी सातत्याने केली आहेत. त्यांचा विनम्र, दिलखुलास आणि संघर्षशील स्वभाव युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
शुभेच्छांचा ओघ दिवसभर सुरुच
आज दिवसभर गावागावातून, तालुक्यातून आणि जिल्हाभरातून शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, युवा कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिलावर्ग आणि अनेक मान्यवर सतत भेट देत आहेत. त्यांच्या निवासस्थानीही दिवसभर स्वागतासाठी ओढ लागलेली आहे. विविध ठिकाणी वृक्षारोपण यासारखे उपक्रमही राबवले जात आहेत.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क कडून राहुल भाऊ पाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांची ही जडणघडण करणारी सामाजिक व राजकीय वाटचाल आणखी यशस्वी व प्रेरणादायी ठरावी, हीच सदिच्छा!
0 टिप्पण्या
Thanks for reading