🗳️ पोंभुर्णा तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत ८ जुलैला!
अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्ग व महिलांकरिता आरक्षण निश्चिती प्रक्रिया
📍 स्थान: पंचायत समिती सभागृह, पोंभुर्णा
🕑 वेळ: दुपारी २.०० वाजता
पोंभुर्णा (प्रतिनिधी):
पोंभुर्णा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२५ रोजी आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पंचायत समिती सभागृह, पोंभुर्णा येथे दुपारी २ वाजता पार पडणार आहे.
या सोडतीद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
सोडतीच्या वेळी उपस्थित राहा!
या कार्यक्रमाला तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व उपसभापती, सदस्य, तसेच सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पोंभुर्णा तहसीलदार सेलवटकर यांनी केले आहे.
✔️ पारदर्शक पद्धतीने होणार आरक्षण सोडत
ही प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असून, यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्टता निर्माण होईल.
Daraara 24 Taas
0 टिप्पण्या
Thanks for reading