नागरिकांचे हित हेच ध्येय – अफवांवर विश्वास नको!
आ. सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्ट प्रतिपादन : “घरे हटवली जाणार नाहीत, नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे”
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | चंद्रपूर, दि. 6 जुलै
बल्लारपूर शहरातील रवींद्रनगर, मौलाना आझाद, पं. दीनदयाल उपाध्याय वॉर्ड व डॉ. राजेंद्रप्रसाद वॉर्डातील वनजमिनीवरील घरे हटवली जाणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यावर आता पडदा पडला असून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी “नागरिकांचे हिताचे रक्षण माझी जबाबदारी” अशी ग्वाही देत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
विश्रामगृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, नेते चंदनसिंह चंदेल, शहराध्यक्ष रणंजय सिंग, तहसीलदार रेणुका कोकाटे तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते.
महत्त्वाचे मुद्दे :
🔹 30 ते 40 वर्षांपासून वनजमिनीवर राहणारे नागरिक बेघर होणार नाहीत.
🔹 एकूण 2,865 घरांमध्ये सुमारे 10,180 नागरिक वास्तव्यास.
🔹 2,585 मालमत्ता वनविभागाच्या जमिनीवर, तर 278 मालमत्ता नझूलच्या जमिनीवर.
🔹 नझूल जमिनीवर पट्टे देणे सुलभ; वनजमिनीवर प्रयत्न सुरू.
🔹 स्थानिक पातळीवर सर्वेक्षण सुरू, दिल्लीपातळीवर विशेष बैठक घेणार.
🔹 सर्व कुटुंबांचा सविस्तर फॉर्म भरण्याचे निर्देश प्रशासनास.
आ. मुनगंटीवार यांचा विश्वास :
“मी नागरिकांच्या पाठीशी ठाम आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र सरकारपातळीवरही विशेष पावले उचलण्यात येतील.”
दरारा 24 तास न्यूज नेटवर्कसाठी विशेष प्रतिनिधी
0 टिप्पण्या
Thanks for reading