Advertisement

बातमीची दखल घेतली, पण कारवाई थातूरमातूरच! नांदगावच्या प्रवेशद्वारावरील जलतरण तलाव कायम



बातमीची दखल घेतली, पण कारवाई थातूरमातूरच!
नांदगावच्या प्रवेशद्वारावरील जलतरण तलाव कायम

नांदगाव (ता. मूल) – गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि बसस्थानक परिसरात निर्माण झालेल्या पाणथळ समस्येची बातमी 'दरारा 24 तास न्यूज नेटवर्क' आणि 'वैनगंगा न्यूज लाईव्ह' युट्युब चॅनेलवरून प्रसारित झाल्यानंतर ग्रामपंचायतीने या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. मात्र कारवाई केवळ कागदोपत्री असल्याचे चित्र समोर येत आहे.

या ठिकाणी मागील अनेक महिन्यांपासून पावसाचे आणि गटाराचे पाणी साचून राहिले आहे. परिणामी, जणू एक जलतरण तलावच तयार झाला आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांच्यासाठी हा प्रकार मोठ्या अडचणीचा ठरत आहे. गावाच्या प्रवेशद्वाराजवळच जलकुंड तयार झाल्यामुळे गावाची प्रतिमा मलिन होत असून, आरोग्यविषयक संकटही निर्माण झाले आहे.

फक्त मुरूम टाकून 'औपचारिक' कारवाई

बातमी प्रसारित झाल्यानंतर ग्रामपंचायतीने पाणथळ भागावर मुरूम टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तो मुरूम केवळ वरवर टाकण्यात आला असून, त्यातून खरा प्रश्न सुटलेला नाही. पाणी तसंच आहे आणि मुरूम पाण्यात मिसळून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

स्थानीय नागरिक संतप्त

ग्रामपंचायतीच्या या थातूरमातूर कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "फक्त फोटोसाठी आणि अहवालासाठी काम केलं जातं, प्रत्यक्षात काहीही सुधारणा नाही," असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

अधिकाऱ्यांकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा

नांदगावसारख्या महत्त्वाच्या गावाच्या प्रवेशद्वारावर जर अशी स्थिती असेल, तर गावाच्या अंतर्गत रस्त्यांची काय अवस्था असेल, असा सवाल आता उपस्थित होतो. ग्रामपंचायतीने यावर तात्काळ स्थायी आणि शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या