Advertisement

सन्मा. दिलीप मॅकलवार सर यांची राष्ट्रमाता विद्यालय, देवाडा खुर्द येथे प्राचार्यपदी पदोन्नती


दरारा 24 तास न्यूज नेटवर्क ● चंद्रपूर

पोंभुर्णा तालुक्यातील राष्ट्रमाता विद्यालय, देवाडा खुर्द येथे कार्यरत असलेले ज्येष्ठ शिक्षक सन्मा. दिलीप मॅकलवार सर यांची दि. 01 जुलै 2025 रोजी प्राचार्यपदी पदोन्नती करण्यात आली. त्यांच्या या पदोन्नतीमुळे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिलीप मॅकलवार सर हे अत्यंत अनुशासित, शांत, नम्र आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेत शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते विविध उपक्रम घेत असतात.

त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना ही पदोन्नती देण्यात आली आहे. प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारताना त्यांनी शिक्षकवृत्ती आणि जबाबदारी यांचे भान ठेवून विद्यार्थ्यांसाठी अधिक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क परिवारातर्फे प्राचार्य दिलीप मॅकलवार सरांना हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!

💐💐💐🌹🌹🌹🌹



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या