Advertisement

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आज भारत बंद! २५ कोटींपेक्षा अधिक कर्मचारी आंदोलनात सामील



दरारा 24 तास न्यूज नेटवर्क ● देशभरात आंदोलनाचा जोर

देशभरात आज (९ जुलै २०२५) भारत बंद ची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय व प्रादेशिक कामगार संघटनांशी संबंधित सुमारे २५ कोटी कर्मचारी या आंदोलनात सामील होणार असल्याची माहिती मिळाली आहे. केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांविरोधात हे व्यापक आंदोलन पुकारण्यात आले आहे.

🔴 बँकिंग व पोस्टल सेवा ठप्प होण्याची शक्यता

या बंदमध्ये देशातील प्रमुख बँकिंग सेवा, पोस्ट ऑफिस, विमा, रेल्वे, कोळसा, स्टील, दूरसंचार, शिक्षण, आरोग्य, वीज आणि वाहतूक विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. त्यामुळे काही महत्त्वाच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🔴 शेतकरी आणि कामगार एकत्र

या आंदोलनात केवळ कामगारच नव्हे, तर शेतकरी संघटनाही मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू झालेल्या असंतोषाची पार्श्वभूमी या आंदोलनामागे आहे.

🔴 प्रमुख मागण्या काय आहेत?

कामगार संघटनांनी केंद्र सरकारसमोर खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:

  • खासगीकरण थांबवावे
  • नवे श्रम कायदे मागे घ्यावेत
  • किमान वेतन वाढवावे
  • रोजगार हमी योजना शहरी भागात लागू करावी
  • शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत

🔴 देशभरात बंदचा प्रभाव

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, नागपूर, चंद्रपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या