दरारा 24 तास न्यूज नेटवर्क ● पोंभुर्णा
एकीकडे सरकार "स्वच्छ भारत मिशन" अंतर्गत स्वच्छतेसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत आहे, तर दुसरीकडे स्वतःला ‘व्हाईट हाऊस’ म्हणवणारी पोंभुर्णा नगरपंचायत कार्यालय अस्वच्छतेचा मूळ केंद्रबिंदू ठरत आहे.
नगरपंचायतीच्या इमारतीचा बाह्य देखावा जरी टापटीप असला तरी आतील परिस्थिती पाहता ‘उपर से टापटीप, अंदर से राम जाने’ अशी जनतेची प्रतिक्रिया आहे. काल (दि. 8 जुलै ) आमच्या प्रतिनिधीने या इमारतीला भेट दिली असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या.
ठळक निरीक्षणे:
🔹 वॉशरूममध्ये पाणी नाही:
नगरपंचायत कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वॉशरूममध्ये पाण्याची सोय नव्हती. त्यातही वॉशरूम अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असल्याचे दिसून आले.
🔹 स्वच्छतेचा अभाव:
कार्यालयाच्या विविध भागांमध्ये धूळ, कचरा, कुजलेले दस्तऐवज व अपूर्ण साफसफाई हे चित्र दिसले. सरकारी कार्यालयात अशी स्थिती असणे दुर्दैवी म्हणावे लागेल.
🔹 कर्मचारी अनुपस्थिती:
अर्धा दिवस उलटून गेल्यानंतरही कार्यालयात केवळ ६ ते ७ कर्मचारी उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांच्या कामासाठी आलेल्यांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
🔹 सीईओ अनुपस्थित:
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (CEO) स्वतः अनुपस्थित होते. मात्र त्यांची केबिन उघडी होती, यावरून अनियमिततेचा अंदाज येतो.
सार्वजनिक पैशाची अशी उधळपट्टी?
लोकांच्या कररूपाने मिळालेल्या निधीतून कार्यालयीन खर्च, स्वच्छता, पाणीपुरवठा यांसाठी तरतुदी असतानाही अशा प्रकारची निष्काळजी वृत्ती ही जनतेच्या पैशांचा अपमान ठरत आहे.
जनतेची मागणी - कारवाईची गरज
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली असून, योग्य चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
"स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संस्थेने आधी स्वतःचा आरसा पाहावा," अशी परखड प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.
दरारा २४ तास न्यूज नेटवर्क पुढील तपशील व कारवाईची माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
✍️
पोंभुर्णा प्रतिनिधी | दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading