दरारा 24 तास न्यूज नेटवर्क ● पोंभूर्णा
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी देशपांडे येथे केंद्रस्तरीय ‘लेव्हल 1’ शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली.
या परिषदेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित डी. पाल यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख मा. तामगाडगे सर (पोंभूर्णा) यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला केंद्र उपाध्यक्ष धनराज म्हशाखेत्री, मुख्याध्यापक गुडेलीवार ताई, देव सर, वाकोडे मॅडम, बावनकर सर, तसेच केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिषदेच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त पद्धती, तसेच अध्यापन कौशल्य वृद्धीबाबत सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन प्रभावीरीत्या पार पाडल्याबद्दल पिपरी देशपांडे शाळेचे संपूर्ण शिक्षकवृंद विशेष कौतुकास पात्र ठरले.
0 टिप्पण्या
Thanks for reading