Advertisement

स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य द्या! दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेचा इशारा — बाहेरील कंपन्यांना विरोध, पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट होणार

🛣️ स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य द्या!


दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेचा इशारा — बाहेरील कंपन्यांना विरोध, पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट होणार

✍️ प्रतिनिधी | सुखसागर एम. झाडे

गडचिरोली —
गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटदारांना शासकीय रस्ते व इतर बांधकामाच्या कामांमध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी ठाम भूमिका दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेने घेतली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक कंत्राटदार बांधवांनी स्वतःची भांडवली गुंतवणूक करून, बँकांकडून कोट्यवधींचे कर्ज घेऊन डांबर प्लांट, वाहने व मशिनरी खरेदी करून मजबूत पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. या माध्यमातून शेकडो सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगारही मिळाला आहे.

🏗️ बाहेरील कंपन्यांचा शिरकाव - नियमभंगाची शक्यता!

अलीकडेच बाहेरील एका नवख्या कंपनीने जिल्ह्यातील शासकीय कामांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न सुरू केला असून, नियमांचे उल्लंघन करून व काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने स्थानिक कंत्राटदारांकडील कामे हिसकावून घेण्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

ही बाब केवळ स्थानिक व्यावसायिकांवर अन्यायकारक असून, रोजगार संधींवरही घाला घालणारी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा कंपन्यांना जिल्ह्यात काम करू दिले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

📰 पत्रकार परिषद उद्या (28 जुलै) – पुढील रणनिती स्पष्ट होणार

यासंदर्भात दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने उद्या, सोमवार दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजता, सर्किट हाऊस, गडचिरोली येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेत स्थानिक कंत्राटदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, आपली व्यथा मांडावी आणि संघटनेच्या पुढील रणनीतीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

स्थानिक रोजगाराचे प्रश्न, जिल्ह्यातील कामांची गुणवत्ता, आणि प्रादेशिक विकास या दृष्टीने ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.


---

📌 मुख्य मुद्दे:

स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य देण्याची मागणी

बाहेरील कंपन्यांच्या नियमबाह्य हस्तक्षेपाला विरोध

स्थानिक रोजगार व उद्योगसंस्थांचे रक्षण

28 जुलै रोजी पत्रकार परिषद – सर्किट हाऊस, गडचिरोली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या