Advertisement

अहेरी पोलिस व उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई : तब्बल 53 लाखांचा मुद्देमाल नष्ट

 

✅ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 



अहेरी पोलिस व उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई : तब्बल 53 लाखांचा मुद्देमाल नष्ट

मनोज गेडाम:अहेरी
अहेरी पोलिस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभाग गडचिरोली यांनी संयुक्त कारवाई करून तब्बल १७२ गुन्ह्यांमधील ५३ लाख ६५ हजार ३९३ रुपयांचा दारू व बिअरचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

या कारवाईत खालीलप्रमाणे जप्त मुद्देमाल नष्ट करण्यात आला :


  • देशी दारू (९० एम.एल.) – ३३,४५४ प्लास्टिक निपा
  • विदेशी दारू (९० एम.एल.) – १६५ निपा
  • विदेशी दारू (१८० एम.एल.) – १६५ काचेच्या बाटल्या
  • विदेशी दारू (३७५ एम.एल.) – ४५ बाटल्या
  • विदेशी दारू (७५० एम.एल.) – २७७ बाटल्या
  • विदेशी दारू (१००० एम.एल.) – ६१ बाटल्या
  • विदेशी दारू (२ लिटर क्षमतेच्या) – १९३ बाटल्या
  • बिअर (५०० एम.एल. टिन) – २०८२ कॅन
  • बिअर (६५० एम.एल.) – ९९२ बाटल्या

सदर मुद्देमाल दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी अहेरी तालुक्यातील भुजंगरापेठा येथील मोकळ्या जागेत नष्ट करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे व पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कार्यवाहीदरम्यान सहायक पोलीस निरीक्षक मंगेश वळवी, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक श्री. ग.द. कुचेकर, उपनिरीक्षक शुभम चौधरी तसेच पोहवा १८५० पोस्टे हेडमोहर व पोलीस स्टाफ यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला.


👉 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या