पोंभूर्णा येथील सावित्रीमाई फुले चौकाचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा
पोंभूर्णा प्रतिनिधी :
पोंभूर्णा शहरातील बस स्टँड चौकाला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले चौक असे नामकरण होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले. या ऐतिहासिक घटनेचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात महाप्रसाद व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून पोंभूर्णा येथील मुख्य चौकाला समाज सुधारक व महिला शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे नाव द्यावे, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत होती. मात्र नगरपंचायतीकडून ठोस भूमिका न घेतल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष भुजंग ढोले यांनी २० ऑगस्ट २०२४ रोजी बस स्टँड चौकात पाच दिवसांचे आमरण उपोषण केले. या आंदोलनानंतर अखेर नगरपंचायत प्रशासन नरमाईला येत चौकाचे नामकरण क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले चौक करण्याचा ठराव मंजूर करून पत्र सुपूर्द केले होते.
या ऐतिहासिक घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाल्याने वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले
0 टिप्पण्या
Thanks for reading