✅ – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
चामोर्शी ते हरणघाट खड्डेमय रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
✍️सुखसागर एम. झाडे, चामोर्शी
चामोर्शी :-
चामोर्शी ते मुल मार्गावरील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत दयनीय होत चालली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक व नागरिकांना प्रवास करताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे.
या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याबद्दल नागरिकांत संतापाची भावना आहे. रस्त्यावरील खड्डेमुळे शाळकरी मुलांसह प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, “तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल” असा इशारा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शी तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सी.ई.ए. कुणाल काकडे, हि.ई.ए. संतोष बहुरे तसेच संगणक कक्ष प्रमुख दीपक सदूलवार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनाद्वारे, “चामोर्शी ते हरणघाट रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल” असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन सुपूर्द करताना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका प्रमुख यशवंत कत्रोजवार, उपप्रमुख चंद्रभुषण वालदे, गटप्रमुख सुरज नैताम, विधानसभा सचिव संतोष कटारे, शहर प्रमुख शुभम चलाख, सदस्य अंकुल फुलझले, प्रशिक नंदेश्वर, कार्तिक चौके, विवेक दुधबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
👉
0 टिप्पण्या
Thanks for reading