Advertisement

पोंभुर्णा तहसील कार्यालयात शांतता बैठकीचे आयोजन

 

✅  दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 



पोंभुर्णा तहसील कार्यालयात शांतता बैठकीचे आयोजन

✍️ प्रतिनिधी

पोंभुर्णा (दि. 21 ऑगस्ट 2025) – गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालय, पोंभुर्णा येथे २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान मा. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, गोंडपिपरी हे भूषवणार आहेत.

या बैठकीसाठी तहसीलदार पोंभुर्णा यांनी विविध विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, नगरपंचायत सदस्य, धार्मिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच पत्रकार बांधवांना आमंत्रित केले आहे.

बैठकीत चर्चिले जाणारे प्रमुख विषय:

  • गणेश उत्सवाचे नियोजन व अंमलबजावणी
  • कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे
  • वीज व पाणीपुरवठा सुरळीत राहावा यासाठी उपाययोजना
  • स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापन
  • सार्वजनिक सोयीसुविधांची उपलब्धता व अडचणींचे निराकरण

शांतता समितीचे सदस्य सचिव म्हणून पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन पोंभुर्णा हे कार्यरत राहणार असून, त्यांनी आवश्यक अहवाल व नोंदींसह बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष निमंत्रित अधिकारी व प्रतिनिधी:

  • गटविकास अधिकारी, पंचायत समिती पोंभुर्णा
  • कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
  • सहाय्यक अभियंता, महावितरण
  • नगराध्यक्ष व नगरसेवक सर्व, नगरपंचायत पोंभुर्णा
  • सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तालुक्यातील सर्व गावे
  • धार्मिक संस्थांचे मौलवी व प्रतिनिधी
  • गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष/प्रतिनिधी
  • शांतता समिती सदस्य सर्व

या बैठकीत सर्व घटकांचा सहभाग अनिवार्य असल्याचे तहसीलदार मोहनिर्शि शेलवटकर यांनी कळवले असून, समाजातील शांतता, सौहार्द आणि शिस्त अबाधित राहण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रतिलिपी स्वरूपात ही माहिती जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर व उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी यांना सादर करण्यात आली आहे.


👉  दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 
"पोंभुर्णा तहसील कार्यालयात २५ ऑगस्ट रोजी शांतता बैठकीचे आयोजन"



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या