पोंभुर्णा व मुल तालुक्यात रवी अण्णा चे प्राबल्य वाढले-
घोसरीच्या सरपंच पदापासून बाजार समिती सभापती पर्यंत – जनसेवेचा सलग प्रवास
पोंभुर्णा / मुल –
पोंभुर्णा आणि मुल तालुक्यातील स्थानिक राजकारणात रविभाऊ मरपल्लीवार यांचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढत असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नाव चर्चेत आले आहे. गेल्या तीन दशकांपासून सातत्याने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि शेतकरीहिताच्या कामांत सक्रिय असलेल्या या नेत्याची कार्यशैली आणि जनतेतील लोकप्रियता यामुळे त्यांचा प्रभाव दोन्ही तालुक्यांत दृढ झाला आहे.
रविभाऊ मरपल्लीवार यांनी आपल्या कार्याचा प्रवास आंध्र प्रदेशातून सुरू करून महाराष्ट्रात प्रवेश केला. 30 वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्ताने ते भोसरी (ता. पोंभुर्णा) येथे स्थायिक झाले. त्या काळात परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक सामाजिक व आर्थिक समस्या उग्र रूप घेत होत्या. शैक्षणिक मागासलेपणा, औद्योगिक संधींचा अभाव, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या विविध अडचणी यावर तोडगा काढण्याचा त्यांनी ध्यास घेतला.
ग्रामपंचायत ते सरपंचपदाचा प्रवास
सामाजिक हेतू जोपासत आणि मनमिळाऊ स्वभावाच्या बळावर, रविभाऊ यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता काबीज केली आणि सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून एकहाती सत्ता प्रस्थापित करत त्यांनी स्थानिक विकासाची गती वाढवली.
बाजार समिती अध्यक्षपदावर कार्यरत
सध्या ते विद्यमान बाजार समिती अध्यक्ष असून, शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यास ते कायम कटिबद्ध आहेत. भारतीय जनता पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांनी नेहमीच जनतेत राहून काम केले असून, राजकीय पदे आणि सत्ता मिळूनही त्यांच्यात कुठलीही अहंभावाची गुर्मी दिसत नाही.
आगामी निवडणुकांविषयी भूमिका
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका काही दिवसांत जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर, रविभाऊ मरपल्लीवार यांनी आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट मत मांडले. “पक्षाने संधी दिल्यास आणि आरक्षण जुळल्यास, कार्यकर्ते व जनतेच्या आशीर्वादाने आणि पक्षाच्या सहकार्याने मी जिल्हा परिषद निवडणूक लढवून पुन्हा जनसेवा करण्यास कटिबद्ध आहे,” असे त्यांनी धावत्या भेटीत सांगितले.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
आज या मनमिळाऊ, सुस्वभावी आणि जनतेच्या मनात स्थान मिळवलेल्या नेत्याचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत, पुढील राजकीय वाटचालीसाठी दीर्घायुष्य व उत्तुंग यश लाभो, हीच जनतेची प्रार्थना आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading