पोंभुर्णा नगर पंचायतच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे भव्य आयोजन
पोंभुर्णा –
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नगर पंचायत पोंभुर्णा यांच्या वतीने १५ ऑगस्ट २०२५ रोजी विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८.१५ वाजता नगर पंचायत कार्यालय प्रांगणात सन्माननीय नगराध्यक्षा सौ. सुलभा गुरुदास पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे. त्याआधी, सकाळी ७.४५ वाजता महात्मा गांधी चौक पोंभुर्णा येथे सन्माननीय उपनगराध्यक्ष श्री. अजित अरुणराव मंगळगिरीवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
या प्रसंगी नगर पंचायतचे मुख्याधिकारी श्री. निखिल अं. लांडगे, सर्व नगरसेवक, नगर पंचायत कर्मचारीवृंद तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणे व देशाच्या प्रगतीविषयी प्रेरणादायी संदेश यांचा समावेश असेल.
मुख्याधिकारी श्री. लांडगे यांनी सर्व नागरिकांना या ऐतिहासिक दिवसाच्या उत्सवात सहभागी होऊन देशभक्तीचा जाज्वल्य संदेश पसरविण्याचे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading