Advertisement

सरपंच हिमानी वाकुडकर यांच्या अपीलवर ग्रामविकास मंत्रींचा अंतिम आदेश नांदगाव ग्रामपंचायत प्रकरणात निर्णय जाहीर

 


सरपंच हिमानी वाकुडकर यांच्या अपीलवर ग्रामविकास मंत्रींचा अंतिम आदेश

नांदगाव ग्रामपंचायत प्रकरणात निर्णय जाहीर

चंद्रपूर – नांदगाव (ता. मुल, जि. चंद्रपूर) येथील सरपंच श्रीमती हिमानी दशरथ वाकुडकर यांनी अपर आयुक्त, नागपूर विभाग यांच्या दि. ७ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या अपीलवर आज ग्रामविकास मंत्रींचा अंतिम आदेश जाहीर झाला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(३) नुसार दाखल करण्यात आलेल्या या अपीलची सुनावणी ३१ जुलै २०२५ रोजी पूर्ण झाली होती.

ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई येथून उपसचिव विनोद बोंदरे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, मंत्री (ग्रामविकास) यांनी दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम निर्णय पारित केला आहे. हा आदेश संबंधित अपर आयुक्त नागपूर विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ तसेच चंद्रपूर यांना कळविण्यात आला आहे.


मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना या स्थगिती आदेशाची प्रत संबंधितांना तात्काळ लेखी पोच देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायत नांदगावचे सचिव, अपिलार्थी श्रीमती वाकुडकर तसेच प्रतिवादी श्री. कृष्णा बंडू मडावी व श्री. सुधाकर मोतीराम बांबोळे यांनाही आदेशाची प्रत पाठविण्यात आली आहे.

नांदगाव ग्रामपंचायतीतील या वादग्रस्त प्रकरणावर राज्यस्तरावरून अंतिम निर्णय लागल्याने ग्रामपंचायतीच्या आगामी कारभारावर त्याचा थेट परिणाम होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या