अजयपूरचे किंग, उद्योजक मधू भाऊ मेश्राम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अजयपूर – आपल्या कार्यकुशलतेने आणि जनसेवाभावाने नेहमीच लोकांच्या हृदयात घर करणारे, अजयपूरचे किंग म्हणून ओळखले जाणारे प्रतिष्ठित उद्योजक मधू भाऊ मेश्राम यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा होत आहे.
व्यवसाय क्षेत्रात नाव कमावतानाच सामाजिक उपक्रमांमध्येही पुढाकार घेणारे मधू भाऊ यांनी स्थानिक पातळीवर अनेक गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांनी रोजगाराच्या संधी मिळवल्या आहेत. गावाच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर असलेल्या त्यांच्या कामगिरीमुळेच ते आज सर्वांच्या मनात आदराचे स्थान राखून आहेत.
स्थानिक नागरिक, व्यापारी बांधव आणि तरुण मंडळींनी त्यांना "अजयपूरचे किंग" ही उपाधी दिली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, ग्रामस्थ, व्यावसायिक वर्ग आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
वैनगंगा न्यूज लाईव्ह परिवार तर्फे मधू भाऊ मेश्राम यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🎂🌹💐
0 टिप्पण्या
Thanks for reading