पक्षाने संधी दिल्यास जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यास मी तयार – अजय भाऊ मस्के यांचे प्रतिपादन
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : विजय जाधव
तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि ग्रामीण भागातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व अजय भाऊ मस्के यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने विश्वास टाकून संधी दिल्यास, आरक्षण कोणतेही असो, मी निवडणूक लढविण्यास सिद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
अजय भाऊ मस्के हे माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे विश्वासू कार्यकर्ते असून, गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात वास्तव्य करून जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. शांत, मनमिळाऊ व मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांची ओळख सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे.
त्यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की, “मी अनुसूचित जाती प्रवर्गातील असलो तरी आरक्षण सर्वसाधारण असले तरी मला हरकत नाही. पक्षाच्या आशीर्वादाने, कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आणि जनतेच्या विश्वासानेच मी काम करण्याचा ध्यास घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेची कामे अधिक प्रभावीपणे करण्याची संधी मिळावी, अशी माझी इच्छा आहे.”
गेल्या काही दिवसांत पोंभुर्णा तालुक्यात त्यांनी केलेल्या कार्यामुळे, स्थानिकांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाच्या नेत्यांनी अंतिम निर्णय घेतल्यास अजय भाऊ मस्के हे आगामी निवडणुकीत एक मजबूत उमेदवार ठरतील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading