दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभूर्णा आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा संपन्न
पोंभूर्णा / प्रतिनिधी :
चिंतामणी इन्स्टिट्यूशनचे संस्थापक स्व. वसंतरावजी दंतुलवार यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभूर्णा आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले.
या निबंध स्पर्धेचा विषय "भाषा आणि वाद : सामाजिक व राजकीय पैलू" असा होता. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांतून एकूण ५७ निबंध प्राप्त झाले. प्राप्त निबंधांचे मूल्यांकन तज्ज्ञ मार्गदर्शकांनी काटेकोरपणे केले व त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
स्व. वसंतरावजी दंतुलवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात बक्षीस वितरण व विशेष मार्गदर्शन सत्र पार पडले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एम. एस. वरकड आणि डॉ. जयश्री कापसे उपस्थित होते, तर डॉ. प्रिया गेडाम आभासीरित्या सहभागी झाल्या.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वेगिनवार होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. शीला नरवाडे, डॉ. जी. एस. गोंड, डॉ. सुधीर हुंगे, डॉ. अनंत देशपांडे आणि अतुल अल्याडवार यांचा समावेश होता.
यावेळी डॉ. वरकड आणि डॉ. कापसे यांनी भाषा आणि भाषेचे महत्त्व, तसेच सामाजिक व राजकीय आयाम यांवर सखोल विचार मांडले. तर अतुल अल्याडवार यांनी स्व. वसंतरावजी दंतुलवार यांच्या जीवनचरित्राचा प्रेरणादायी प्रवास उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला.
स्पर्धेच्या निकालानुसार —
- प्रथम पारितोषिक : श्रीकांत विलास शेंडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
- द्वितीय पारितोषिक : समीरा रेडकर, एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई
- तृतीय पारितोषिक : अमन अनमवार, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
तसेच प्रोत्साहनपर बक्षिसे दोन विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून तसेच प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैशाली मुरकुटे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. वर्षा शेवटे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कुलकर्णी यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्सचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच विद्यार्थी विकास विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या टीमने मोलाचे सहकार्य केले.
0 टिप्पण्या
Thanks for reading