Advertisement

पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा — अल्का आत्राम यांची मागणी

 



पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा — अल्का आत्राम यांची मागणी

पोंभुर्णा :
तालुक्यातील शेतकऱ्यांचे वर्ग दोन शेतीचे वर्ग एकात रूपांतर करण्याचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. आतापर्यंत तब्बल ८० शेतकऱ्यांचे अर्ज तहसील कार्यालयात प्रलंबित असून, जाचक अटी-शर्ती व गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना स्वतःच्याच शेतीसाठी भाडे द्यावे लागत असल्याची विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

याशिवाय अनेक शेतकऱ्यांचे महत्त्वाचे दास्तावेज मिळत नसल्याने त्यांना सतत तहसील कार्यालयाचे हेलपाटे घालावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिकच नव्हे तर मानसिक ताणही वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अल्का आत्राम यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर) व तहसीलदार, पोंभुर्णा यांना निवेदन सादर करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी केली आहे.

निवेदनानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ लक्ष घालत तहसीलदारांना योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश दिल्याचे समजते.

अल्का आत्राम यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, शासन व प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.



📰 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या