Advertisement

घनोटी तुकूम येथे स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने संयुक्त वनव्यवस्थापन समितीची स्थापना श्री रामकृष्ण भाऊ गव्हारे अध्यक्ष, श्री मारोतराव पिपरे उपाध्यक्ष




घनोटी तुकूम येथे स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने संयुक्त वनव्यवस्थापन समितीची स्थापना

श्री रामकृष्ण भाऊ गव्हारे अध्यक्ष, श्री मारोतराव पिपरे उपाध्यक्ष

✍️ प्रतिनिधी / पोंभूर्णा

पोंभूर्णा तालुक्यातील घनोटी तुकूम येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाचा ऐतिहासिक सोहळा उत्साहात पार पडला. याच दिवशी गावाच्या विकास आणि वनसंवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल टाकत संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.


या समितीच्या अध्यक्षपदी सर्वांचे विश्वासू व लोकमान्य व्यक्तिमत्त्व श्री रामकृष्ण भाऊ गव्हारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणारे, सर्वांचे परिचित श्री मारोतराव पिपरे यांची निवड झाली.

कार्यक्रमाच्या वेळी सचिव म्हणून कु. कातकर मॅडम यांची निवड झाली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील मान्यवर, तसेच असंख्य नागरीक उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि गावकऱ्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन कुशलतेने पार पाडण्यात आले आणि उपस्थितांनी वनसंवर्धन, पर्यावरण संरक्षण व गावाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या