Advertisement

करंजी गाव यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेपासून वंचित

 


करंजी गाव यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेपासून वंचित


गोंडपिपरी (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेचा निधी मिळाल्यानंतरही तो सोयीनुसार इतरत्र वळविला जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. परिणामी, गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गाव या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहे.


करंजी हे राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांचे जन्मगाव असून, सध्या या क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे सत्तेत आहेत. तरीदेखील, गरिब आणि खर्‍या गरजूंना या योजनेचा लाभ मिळावा ही जनभावना अद्यापही अपूर्ण आहे.


गट विकास अधिकारी संजय पुप्पलवार यांच्या कार्यकाळात निधीचे नियोजन व वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, स्थानिक नागरिकांत संतापाची भावना व्यक्त होत आहे. गावकऱ्यांचा ठाम आग्रह आहे की, घरकुल योजनेचा निधी प्रामाणिकपणे वितरित करून गरजू लाभार्थ्यांना तातडीने मदत करण्यात यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या