भटक्या जमाती ‘ब’ चं आरक्षण पूर्ववत 2.5 टक्के करावं; न केल्यास आंदोलनाचा इशारा
✍️ सुखसागर एम. झाडे
चामोर्शी (जि. गडचिरोली) :
भटक्या जमाती ‘ब’ (भोई/ढीवर व तत्सम जाती) समाजाचे 2.5 टक्के आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, अशी ठाम मागणी करून या समाजाने सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी गडचिरोली तालुका शाखा, चामोर्शीच्या वतीने तहसीलदार चामोर्शी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात भटक्या जमाती ‘ब’ चे आरक्षण पुन्हा पूर्ववत 2.5 टक्के करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनाचा इशारा
समाजाच्या या मागणीची दखल न घेतल्यास आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन उभारले जाईल, असा इशारा तालुका अध्यक्ष तथा माजी गटविकास अधिकारी पी. जे. सातार यांनी दिला.
निवेदन प्रसंगी उपस्थित मान्यवर
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गद्दे, तालुका अध्यक्ष पी. जे. सातार, उपाध्यक्ष हरिष गेडाम, गुरुदास गेडाम, तालुका सचिव सुभाष सरपे, तालुका महिला अध्यक्षा सौ. वर्षा सरपे, तसेच प्रवीण टिंगूसले (तळोधी), कालिदास वाघाडे (कूनघाडा), ज्ञानेश्वर भोयर (तळोधी), दीपक सातार (जामगिरी), महेश शिंदे (चामोर्शी), विलास शेंडे (लखमापूर बोरी), प्रभाकर कांबळे (हळदी माल), सीमा भोईर (तळोदी), दर्शन बावणे (तळोदी), पंकज कल्चर (जामगिरी), देविदास भोयर (फराडा), खुशाल झबाडे (बोरी), मुकरू मेश्राम (बोरी), अनिकेत मेश्राम (बोरी), मुकरू शेंडे (वाकडी), काशिनाथ भोयर (तळोधी), योगराज गेडाम (तळोधी), संतोष भोयर (तळोधी), अंकुश कांबळे (हळदीमाल), विजय सातार (घोट), धोदराम राऊत (घोट), अतुल सातार (घोट), रवींद्र सातार (घोट), तेजश्वर शेंडे (वाकडी), गुरुदास भोयर (दोटकुली), गुणाजी बावणे (वाकडी), मारुती राऊत (गणपुर रे), संजय राऊत (गणपुर रे), सुभाष राऊत (गणपुर रे), यादव सातार (गणपुर), युवराज सातार (जामगिरी), घनश्याम कलचर (जामगिरी), दिलीप गद्दे (गणपुर), धर्माजी राऊत (गणपुर), पार्वताबाई गद्दे (गणपुर), बालाजी राऊत (जामगिरी), घनश्याम राऊत (जामगिरी), अनिल वाघाडे (जामगिरी), पंकज कलचर (जामगिरी), दुधराम वाघाडे (जामगिरी), विलास कलचर (जामगिरी), लोमेश भोयर (कुरुड), सतीश कोठारकर (जयरामपूर), सपना सरफे (मार्कंडा देव), देवाजी भोयर (घारगाव), बंडू गेडाम (घारगाव), मारुती आगरे (ग्रामपंचायत सदस्य, मोहर्ली), संजय भोयर (मोहर्ली) यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
समाजाच्या आरक्षणाबाबतचा हा निर्णायक टप्पा ठरणार असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी या निवेदनातून करण्यात आली.
0 टिप्पण्या
Thanks for reading