👍 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद द्यावे – रवींद्र मरपल्लीवार यांची नितीन गडकरींकडे मागणी
✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
दिल्ली :
चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मंत्रिपद देण्यात यावे, अशी ठाम मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती, पोंभुर्णा चे सभापती रवींद्र मरपल्लीवार यांनी केली आहे.
याबाबत रवींद्र मरपल्लीवार यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रश्न मांडत जिल्ह्याच्या विकासासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
चंद्रपूरसाठी सक्षम नेतृत्वाची गरज
चंद्रपूर जिल्हा हा कोळसा, वीज, वनसंपदा, पर्यटन आणि औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून, येथे विकासकामांना मोठ्या प्रमाणावर गती मिळावी यासाठी सक्षम नेतृत्व हवे असल्याचे मरपल्लीवार यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार हे राज्यात अनुभवी, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेते असून, त्यांनी यापूर्वी अर्थ, वन, सांस्कृतिक कार्य, वनीकरण अशा महत्त्वाच्या खात्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले आहे.
गडकरींना दिला विकासाचा आराखडा
मरपल्लीवार यांनी गडकरी साहेबांसमोर चंद्रपूर जिल्ह्याचा विकास आराखडा सादर करताना अनेक प्रलंबित प्रकल्प, रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांच्या समस्या, उद्योगधंद्यांचा विस्तार, पर्यटन क्षेत्राची क्षमता यावर सविस्तर चर्चा केली.
या सर्व मुद्द्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सक्षम समन्वय होणे आवश्यक असून, त्यासाठी मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जिल्ह्यात अपेक्षांचा उद्रेक
मरपल्लीवार यांच्या या मागणीला जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, तरुण वर्ग आणि सामाजिक संघटनांकडूनही पाठिंबा मिळत आहे. जिल्ह्याचे प्रतिनिधित्व सक्षम हातात गेले तर विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे.
👉 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क वेबसाईट
0 टिप्पण्या
Thanks for reading