Advertisement

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांचा पुण्यात नाम फाउंडेशनतर्फे गौरव- अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना गडचिरोली जिल्ह्यात येण्यासाठी निमंत्रण

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क


राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांचा पुण्यात नाम फाउंडेशनतर्फे गौरव

अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना गडचिरोली जिल्ह्यात येण्यासाठी निमंत्रण

गडचिरोली : ✍️सुखसागर एम. झाडे

मानवतेच्या कार्यासाठी सतत धडपडणाऱ्या नाम फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा पुणे येथे उत्साहात पार पडला. सन २०१५ मध्ये “जे जे जगी जगते तया माझे म्हणा, करुणा करा” या उदात्त भावनेतून स्थापन झालेल्या या फाउंडेशनने गेल्या दहा वर्षांत शेतकरी, ग्रामीण भागातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे.

या दशकपूर्ती सोहळ्यात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांचा नाम फाउंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला. हा सत्कार अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे तसेच राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते झाला. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच, तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे ५० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते पुणे येथे विशेषतः उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, तसेच नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे प्रामुख्याने उपस्थित होते.

सोहळ्यादरम्यान डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना गडचिरोली जिल्ह्यात येण्यासाठी आमंत्रण दिले. या निमंत्रणाचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले.

कार्यक्रमास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा पौर्णिमा विश्वास, जिल्हा मार्गदर्शक देवानंद पाटील खुणे, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषा मडावी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत शहा, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, सचिव प्रकाश थुल, तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, तालुका पदाधिकारी तसेच रुपाली कावळे, पुष्पा करकाडे, पूनम हेमके, विशाखा सिंह, लीना विश्वास, शिवशंकर मडावी, सतीश कोवे, लक्ष्मण उईके, प्रभाकर कुमोटी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या भव्य सोहळ्यात जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने नाम फाउंडेशनचे आभार मानण्यात आले. तसेच माणुसकीचा हा यज्ञ पुढेही अखंड सुरू राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या