Advertisement

📰 सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

🙏 



📰 सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

सावली (दि. 5 सप्टेंबर 2025)

सावली वनपरिक्षेत्रातील पाथरी उपक्षेत्रात गुरुवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व वातावरण पसरले असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.

घटनेचा तपशील :

मिळालेल्या माहितीनुसार, मौजा पाथरी येथील श्री. पांडुरंग भिकाजी चचाने (वय 73 वर्षे) हे सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास त्यांच्या सर्वे क्र. 51 मधील शेतात गवत कापण्याचे काम करीत होते. त्या वेळी अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर वाघाने मृतदेह शेजारच्या वनक्षेत्रातील कक्ष क्र. 1662 मध्ये सुमारे 50 मीटर अंतरापर्यंत ओढत नेला.

वनविभागाची तात्काळ कारवाई :

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक श्री. विकास तरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी सावली श्री. विनोद धुर्वे, क्षेत्र सहाय्यक श्री. नंदकिशोर पाटील व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय, सावली येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

वाघ पकडण्यासाठी मोहीम :

गावकऱ्यांच्या मागणीनंतर वनविभागाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. वरिष्ठांच्या परवानगीने विभागीय वनाधिकारी चंद्रपूर श्री. राजन तलमलेसहाय्यक वनसंरक्षक श्री. विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली व वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. विनोद धुर्वे आणि जीवशास्त्रज्ञ श्री. नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेत 14 ट्रॅप कॅमेरे आणि 3 लाईव्ह कॅमेरे बसविण्यात आले असून, क्षेत्र सहाय्यक श्री. पाटील व श्री. मेश्राम तसेच वनरक्षक श्री. कराड, श्री. खुडे, श्री. नान्हे, श्री. नागोसे, श्री. आखाडे, श्री. मुंडे, श्री. बोनलवार, श्री. आदे व पीआरटी चमू सक्रियपणे कार्यरत आहेत.

ग्रामस्थांमध्ये भीती :

या घटनेमुळे पाथरीसह आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वाघाला तातडीने पकडावे व पीडित कुटुंबाला योग्य ती मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.


👉 वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क/दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या