Advertisement

नाट्यगीता मुळेच शास्त्रीय संगीताला प्रसिद्धी – प्रा. डॉ. शेखर डोंगरे




नाट्यगीता मुळेच शास्त्रीय संगीताला प्रसिद्धी – प्रा. डॉ. शेखर डोंगरे

गडचिरोली : दरारा 24 तास 
झाडीपट्टी रंगभूमी ही मराठी रंगभूमीचा अविभाज्य भाग असून “मराठी नाट्यगीतांमुळेच शास्त्रीय संगीताची निर्मिती होऊन त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली”, असे मौल्यवान उद्गार ज्येष्ठ रंगकर्मी व कलावंत प्रा. डॉ. शेखर डोंगरे यांनी व्यक्त केले.

दिनांक ३ सप्टेंबर रोजी झाडीपट्टी कलावंत संस्था, गडचिरोली यांच्या वतीने विदर्भ स्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन कमल केशव सभागृहात करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. शेखर डोंगरे यांनी भूषविले. तर उद्घाटक म्हणून प्रा. राजूभाऊ कात्रटवार (माजी नगरसेवक, गडचिरोली), कार्यकर्ते बाशीद शेख, संगीतकार प्रल्हाद मेश्राम (वडसा), वनपाल सुनील पेंदोरकर, अरविंद गेडाम (नागरी बँक), ज्येष्ठ रंगकर्मी दादा चुधरी, सुनील चडगूलवार, चुडाराम बल्लारपूरे आदी मान्यवर उपस्थित होते.

नटेश्वर पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी चडगूलवार आणि बाशीद शेख यांनी मनोगते व्यक्त केली. उद्घाटन प्रसंगी प्रा. कात्रटवार यांनी “कलावंत संस्थेचा हा स्तुत्य उपक्रम असून नवरात्रोत्सवातही असेच उपक्रम व्हावेत” अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषण

अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. डोंगरे म्हणाले, “शास्त्रीय संगीताची गायकी असलेल्या गायकांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. झाडीपट्टीतील नाट्यकलावंतांचे प्रमाण कमी झाले असले तरी अशा स्पर्धा ही काळाची गरज आहे. नाट्यगीत हळूहळू लोप पावत असून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.”

सत्कार व परीक्षक

कार्यक्रमात ज्येष्ठ नाटककार सिद्धार्थ गोवर्धन, ज्येष्ठ कलावंत वासुकुमार व राजेंद्र जरुडकर, तसेच ज्येष्ठ महिला कलावंत उषा किरण यांचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून संगीतकार प्रल्हाद मेश्राम, संगीत शिक्षिका वैशाली मडावीतुलाराम राऊत यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील सहभाग व निकाल

या स्पर्धेत ७ वर्षांपासून ते ७१ वर्षांपर्यंतच्या २९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. निकाल जाहीर करताच बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

  • प्रथम पारितोषिक – संतोष प्रधान (आरमोरी)
  • द्वितीय पारितोषिक – राजू ठाकूर (चिखली)
  • तृतीय पारितोषिक – आसावली ठोंबरे (गडचिरोली)
  • चतुर्थ पारितोषिक – असीम कृपाकर (गडचिरोली)
  • प्रोत्साहनपर बक्षिसे – अनु. वनश्री मेश्राम (ब्रम्हपुरी), जिशान शेख व हिरल सोनटक्के (गडचिरोली)

सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

बक्षीस वितरण सोहळा

बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनिल धमोळे (जिल्हा वार्ताहर, दैनिक देशोन्नती) यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती मारोतराव इचोडकर, प्राचार्य चापले सर, प्रवीण भाऊ मुक्तावरम, माजी सभापती बानबले सर, पुढके सर आदी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अनिल धमोळे म्हणाले, “कलावंत संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असून समाजप्रबोधनपर जनजागृती कार्यक्रम सातत्याने राबवावेत. त्यासाठी माझे सहकार्य कायम राहील.”

सूत्रसंचालन व आयोजन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ गोवर्धन व वर्षा गुरनुले यांनी केले. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र उपाध्यायदिलीप मेश्राम यांनी, तर आभारप्रदर्शन राज बोभाटेविवेक मुन यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोषाध्यक्ष मारोती लाकडे यांच्यासह भगवान गेडाम, सदाभाऊ उईके, प्रकाश लाडे, अशोक सूत्रपवार, नवीन शेंडे, रुमाजी भुरले, प्रकाश मेश्राम, शाहीर तुळशीराम उंदीरवाडे, वसंत चापले, विवेक मुन, अमित पिपरे, हेमंत कावळे, राज मराठे, संदीप कुरावटकर, निरंजन भरडकर, ओमप्रकाश संग्रामे, वीरेंद्र सोनावणे, गुरुदेव नैताम, अनिल कडुकर, आयशा अली, उषा मुळे, प्रा. गहाणे, टिकाराम सालोटकर, सविता भोयर आदींनी परिश्रम घेतले.


👉 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या