Advertisement

खुनाच्या गुन्ह्यात सक्रीय सहभागी असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिसांची अटक


खुनाच्या गुन्ह्यात सक्रीय सहभागी असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिसांची अटक

✍️ सुखसागर एम. झाडे

गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी दहशतवादाविरोधातील लढाईत गडचिरोली पोलिस दलाला मोठे यश मिळाले आहे. खुनाच्या गंभीर गुन्ह्यात सक्रीय सहभाग असलेल्या एका जहाल माओवाद्यास हैद्राबाद (तेलंगणा) येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

🔹 रामजी चिन्ना आत्राम हत्येत सहभाग
नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा कापेवंचा (जिल्हा गडचिरोली) येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम यांच्या हत्येमध्ये या माओवादीचा थेट सहभाग असल्याची खात्री झाली होती.

🔹 पेरमिली दलममध्ये सक्रिय कामगिरी
सन 2024 पर्यंत पेरमिली दलम संपूष्टात येण्यापूर्वी तो या दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होता. नंतर पेरमिली दलम मोडीत निघाल्यानंतर त्याने मोठ्या शिताफीने तेलंगणा राज्यातील हैद्राबाद शहरात आश्रय घेतला होता.

🔹 गोपनीय सूत्रांच्या आधारे कारवाई
गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार अहेरी पोलीस विभागाने कसून तपास सुरू केला. दीर्घ काळ चाललेल्या शोधमोहिमेनंतर शेवटी गडचिरोली डिव्हिजनमध्ये तब्बल सहा वर्षांपासून सक्रीय असलेल्या या जहाल माओवाद्यास पोलिसांनी शिताफीने हैद्राबाद येथून ताब्यात घेतले.

🔹 बक्षीस घोषित
सदर माओवादीवर महाराष्ट्र शासनाने दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याच्या अटकेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील पोलिस दलाचा मनोबल उंचावला असून, माओवादी कारवायांवर मोठा आळा बसणार आहे.

👉 गडचिरोली पोलिसांच्या या यशस्वी कारवाईबद्दल जिल्ह्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या अटकेमुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या