पंचायत समिती सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत — 13 ऑक्टोबर रोजी पोंभुर्णा येथे विशेष सभा
पोंभुर्णा तालुक्यातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
पोंभुर्णा (ता.चंद्रपूर) – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर, पंचायत समिती निवडणूक गणातील सदस्य पदांसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया येत्या 13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता पंचायत समिती सभागृह, पोंभुर्णा येथे पार पडणार आहे.
ही सोडत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील कलम 9(1) तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद (निवडणूक विभाग व निवडणूक घेण्याबाबत) नियम 1962 मधील नियम 2(अ) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम 2025 यांच्या अनुषंगाने केली जाणार आहे.
या प्रक्रियेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
तहसीलदार तथा मतदार नोंदणी अधिकारी मोहनिश शैलवटकर यांनी जारी केलेल्या पत्रकात सांगितले आहे की, आरक्षण सोडतीची प्रक्रिया पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने पार पडेल.
तसेच पोंभुर्णा तालुक्यातील सर्व नागरिक आणि मतदारांनी या विशेष सभेला उपस्थित राहून आरक्षण सोडतीची प्रक्रिया पाहावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
📍 ठिकाण: पंचायत समिती सभागृह, पोंभुर्णा
🗓️ दिनांक: 13 ऑक्टोबर 2025
🕒 वेळ: दुपारी 3.00 वा.
📞 संपर्क: तहसील कार्यालय, पोंभुर्णा — 07171-295999
📧 ई-मेल: Tah.Pombhurna@gmail.com




0 टिप्पण्या
Thanks for reading