Advertisement

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न : मतदार यादीतील त्रुट्यांवर होणार सखोल आक्षेप नोंदणी


✍️ गडचिरोली प्रतिनिधी - सुखसागर एम. झाडे

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा समान अधिकार दिलेला आहे. मात्र, सत्ताधारी भाजप सरकारने निवडणूक आयोगाचा दुरुपयोग करून मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेरफार व गोंधळ निर्माण केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. नुकतेच विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते माननीय राहुल गांधी यांनी या गंभीर प्रकाराचा उलगडा केला होता. त्यानंतर देशभरातील काँग्रेस पक्षाने या संदर्भात तपास व छाननी सुरू केली असून, गडचिरोली जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर त्रुट्या, दुबार नोंदणी तसेच हयात असलेल्या मतदारांची नावे गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे पार पडली. बैठकीत मतदार यादीतील विविध अनियमितता, त्रुट्या व गहाळ नावे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी मतदार यादींची तपासणी करून आक्षेप नोंदविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

बैठकीत प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, वडसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत रमेश चौधरी, प्रभाकर वासेकर, नंदू वाईलकर, वामनराव सावसाकडे, नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, सुरेश भांडेकर, अब्दुल पंजवानी, रजनीकांत मोटघरे, दत्तात्र्य खरवडे, उत्तम ठाकरे, विनोद लेनगुरे, संजय चन्ने, भूपेश कोलते, राकेश रत्नावार, प्रेमानंद गोंगले, सुभाष धाईत, श्रीनिवास ताडपल्लीवार, राजेश ठाकूर, अनिल कोठारे, महादेव भोयर, प्रशांत सोमकूवर, सचिन गावतुरे, विलास चिचघरे, अविनाश श्रीरामवार, जितेंद्र मुनघाटे, विनायक चिचघरे, राजेंद्र आखाडे, संजय मेश्राम, सुधीर टेम्भूर्णे, परमेश्वर गावडे, चंद्रशेखर मडावी, उमेश आखाडे, नागोराव उईके, पुरुषोत्तम सिडाम, रमेश मानकर, गोरख उंदीरवाडे, चुळाराम कोलते, आशुतोष भरणे, योगेश चापले, आकाश बगडे, अनिल भांडेकर, अजय भांडेकर, दिनेश सिडाम, मिलिंद बारसागडे, हेमंत कोवासे, संतोष पीपरे तसेच सौ. अशाताई मेश्राम, सौ. अपर्णाताई खेवले, सौ. कल्पनाताई नंदेश्वर, सौ. रिताताई गोवर्धन व इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले की, “मतदान हा लोकशाहीचा कणा आहे. मतदार यादीतील गोंधळ हा लोकशाहीवर घाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराचे नाव योग्य प्रकारे नोंदले जावे, यासाठी काँग्रेस पक्ष संघटित पद्धतीने जनजागृती मोहीम राबवून आक्षेप नोंदविणार आहे.”


📺 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क साठी
– सुखसागर एम. झाडे, प्रतिनिधी, गडचिरोली



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या