📰 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात शैक्षणिक एबीसी आयडी मार्गदर्शन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन
✍️ तालुका प्रतिनिधी – सुखसागर झाडे, चामोर्शी
📅 दि. ११ ऑक्टोबर २०२५
चामोर्शी –
स्थानिक शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय, चामोर्शी येथे आज "एबीसी आयडी मार्गदर्शन कार्यक्रम" उत्साहात पार पडला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट (ABC) या महत्त्वाकांक्षी योजनेविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. शिल्पा काशेट्टीवार होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. प्रवीण मडावी, प्राचार्य, जागेश्वर सावकार गण्यारपवार महाविद्यालय, घोट यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना एबीसी आयडी म्हणजे काय, त्याचे उद्दिष्ट, फायदे, नोंदणी प्रक्रिया तसेच भविष्यातील शैक्षणिक प्रवासात या डिजिटल प्रणालीचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली.
प्रवीण मडावी सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की —
"एबीसी आयडी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक मोठी क्रांती आहे. शिक्षणाचे डिजिटायझेशन आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण क्रेडिट बँकिंग प्रणालीमध्ये रूपांतर हे भविष्यातील शिक्षणाची दिशा ठरवणारे आहे."
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निराकरण करून घेत कार्यक्रम अधिक ज्ञानवर्धक बनवला.
या मार्गदर्शन सत्राचे संयोजन महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक प्रा. नितेश सावसाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील प्रा. नितेश सावसाकडे यांनीच केले, तर आभार प्रदर्शन सहा. प्रा. नोमेश्वर झाडे सर यांनी मानले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक तंत्रज्ञानाची जाण, डिजिटल प्रणालींचा उपयोग आणि शिक्षणातील आत्मनिर्भरतेचा दृष्टिकोन निर्माण झाला असल्याचे मत उपस्थित शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनापासून प्रयत्न केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना "शिकत राहा आणि पुढे चला" हा संदेश मिळाला, असे उपस्थितांनी नमूद केले.
📺 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
*"शिक्षणातून समाज

 



 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या
Thanks for reading