दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 👇
🛕 श्री साई पादुका दर्शन सोहळ्यात माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे पवित्र दर्शन व साईचरणी कोटी प्रणाम!
गडचिरोली (दि. १४ ऑक्टोबर २०२५) —
भक्तीभाव, श्रद्धा आणि अध्यात्माने ओथंबलेल्या गडचिरोली नगरीत साई भक्तांच्या उपस्थितीत श्री साई पादुका दर्शन सोहळा अत्यंत मंगल वातावरणात पार पडला. या पवित्र प्रसंगी माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेऊन साईचरणी कोटी प्रणाम केला.
डॉ. नेते यांनी या भक्तीमय सोहळ्यादरम्यान उपस्थित सर्व साईभक्तांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि सद्गुरु साईनाथ महाराज यांच्या चरणी प्रार्थना केली की, “साई कृपाशिर्वादाने प्रत्येक भक्ताच्या जीवनात सुख, समाधान आणि मंगलमयतेचा प्रकाश नांदो.”
या प्रसंगी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवून डॉ. नेते यांचा शाल, श्रीफळ, साईबाबांचे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला. त्यांच्या या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिभावाने उजळून निघाला.
सदर सोहळ्याच्या माध्यमातून साईभक्तांनी मानवतेचा, श्रद्धेचा आणि एकतेचा संदेश देत सद्गुरुंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. भक्तांच्या जयजयकाराने आणि साईनामस्मरणाने वातावरण भारलेले होते.
या वेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, अॅड. राम मेश्राम, लिलाधर भरडकर, सतीश विधाते, रवी चन्नावार, प्रशांत पा. चिटनुरवार, रजनीकांत मोटघरे, रुषिकेश बारापात्रे, साई संस्थानचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.
या पवित्र सोहळ्यातून “साई कृपाशिर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सद्भाव, शांतता आणि समाधान नांदो,” अशी सामूहिक भावना प्रकट झाली.
✍️ प्रतिनिधी : सुखसागर एम. झाडे
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क, गडचिरोली

 



 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या
Thanks for reading