Advertisement

पालकवर्ग-शिक्षक यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विविध समस्यांवर विचार-मंथन

 *श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन*



 *पालकवर्ग-शिक्षक यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विविध समस्यांवर विचार-मंथन*


चामोर्शी- (आष्टी) सुखसागर झाडे. 


      चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी येथे पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 माजी संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय प्राचार्य रमेशचंद्र मुनघाटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एम. माटे, प्रमुख पाहुणे श्री महेंद्र खोब्रागडे, डॉ. अपर्णा मारगोनवार, डॉ. सोनाली धवस, प्रा. सचिन मुरकुटे मंचावर उपस्थित होते. 

या सभेत पालक शिक्षक संघटना तसेच संघटनेची कार्यकारणी गठीत करण्यात आले .

पालक व शिक्षक यांच्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या तसेच शैक्षणिक विविध बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली . 

पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एम. माटे,  महेंद्र खोब्रागडे उपाध्यक्ष, डॉ. सोनाली धवस सचिव, डॉ.पी. के. सिंग, डॉ. दीपक नागापुरे,  शिरसागर,  सुमंत परमाणिक यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या सभेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यावर विचार मंथन करण्यात आले. 

विद्यार्थी शिक्षण घेताना प्रामाणिक असावा आणि ध्येय गाठण्यासाठी खूप मेहनत करावी.

असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माटे सर यांनी केले. प्रा.जया रोकडे यांनी पालक शिक्षक सभेचे महत्त्व पटवून दिले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.कवींद्र साखरे, संचालन डॉ.दीपक नागापुरे तर आभार प्रदर्शन डॉ.सोनाली धवस यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पि. के. सिंग, डॉ. एम.पी. सिंग, डॉ.प्रदीप कश्यप, प्रा. महेश  सिलमवार, प्रा. सुबोध साखरे,प्रा. पल्लवी शहा, प्रा. राहुल आवारी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सविता गारगाटे,  अविनाश जीवतोडे, विजय खोब्रागडे, शुभांगी डोंगरे, रवींद्र झाडे, रमेश वागदरकर, उषाताई माहूरपवार, पौर्णिमा गोहणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर  कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या