Advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांना बळ देणारी – निरीक्षक उमाकांत अग्निहोत्री

 


स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांना बळ देणारी – निरीक्षक उमाकांत अग्निहोत्री
बल्लारपूर, प्रशांत रणदिवे ( तालुका प्रतिनिधी)

बल्लारपूर येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा सभेत प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक उमाकांत अग्निहोत्री यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “काँग्रेस पक्ष हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आजचे सत्ताधारी मतचोरीतून सत्तेवर आले असून देशपातळीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात या सरकारविरुद्ध जनआंदोलन सुरू आहे. कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांची निवडणूक ठरणार आहेत. या निवडणुका जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि एकतेच्या बळावर लढवून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका यांत काँग्रेसची सत्ता आणावी,” असे आवाहन त्यांनी केले.

ही आढावा सभा बल्लारपूर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे गुरुवार दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली.

सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे होते. या सभेला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषसिंग रावत, प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी, ज्येष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे, शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य, तालुका काँग्रेस अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी अध्यक्ष अब्दुल करीम शेख, डॉ. अनिल वाढई आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अध्यक्ष सुभाष धोटे म्हणाले की, “आपली लढाई ही विचारसरणीची आहे. काँग्रेस पक्षाला बळकटी देणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. नेतेपद हे कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच टिकते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला आत्मविश्वासाने उतरायचे आहे. मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे प्रयत्न केल्यास निश्चितपणे यश आपल्या पावलांखाली येईल.”

प्रास्ताविक घनश्याम मुलचंदानी यांनी केले, संचालन शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी तर आभार प्रदर्शन नरेश मुदंडा यांनी केले.

या सभेला शहर व ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सभागृहात उत्साही वातावरणात निवडणूक तयारीची दिशा ठरविण्यात आली.

✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी – बल्लारपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या