Advertisement

बुद्धगिरी मुल येथे भिक्खू संघाद्वारे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष सिंह रावत यांचा सत्कार बौद्ध धम्माच्या प्रचार–प्रसारात भिक्खू संघाचे मोलाचे योगदान – संतोष सिंह रावत

 

बुद्धगिरी मुल येथे भिक्खू संघाद्वारे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष सिंह रावत यांचा सत्कार



बौद्ध धम्माच्या प्रचार–प्रसारात भिक्खू संघाचे मोलाचे योगदान – संतोष सिंह रावत

मुल (प्रतिनिधी): बुद्धगिरी टेकडी, मुल येथे आयोजित वर्षावास समाप्ती संघदान व कठीण चिवरदान महोत्सव सोहळा अत्यंत भाविकतेने संपन्न झाला. या कार्यक्रमानिमित्त श्रद्धेय भदंत संघवस थेरो यांच्या १९व्या वर्षावास समाप्तीचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघाचे महासचिव श्रद्धेय भदंत सुमनवंनो महाथेरो, भदंत संघवस थेरो (बुद्धगिरी टेकडी, मुल), भदंत आनंद थेरो (बल्लारपूर), भिक्खू धम्मप्रकाश संबोधी (चंद्रपूर) आणि भिक्खू सुजात (नागपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोष सिंह रावत यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

भिक्खू संघाला त्यांनी आजवर दिलेल्या धम्मदानाचे आणि बुद्धगिरी टेकडी येथील भदंत संघवस थेरो यांच्या निवासासाठी उभारलेल्या सुंदर कुटीचे योगदान लक्षात घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

सत्कारानंतर आपल्या मनोगतात संतोष सिंह रावत म्हणाले, “भिक्खू संघ टिकला तर बुद्ध धम्माचा प्रचार–प्रसार अधिक जोमाने होईल. तथागत गौतम बुद्धांनी दिलेला करुणा, मैत्री आणि शांततेचा संदेश हा जगाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक आहे. समाजाने पुढाकार घेऊन भिक्खू संघाला धम्मदानाच्या स्वरूपात सहकार्य करणे ही काळाची गरज आहे.”

भदंत संघवस थेरो यांनीही संतोष सिंह रावत यांच्या धम्मसेवेचे कौतुक करत म्हटले की, “त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेले धम्मदान निरंतर सुरू राहो हीच आमची शुभेच्छा.”

या सोहळ्यात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरु गुरुनुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, काँग्रेस शहराध्यक्ष सुनील शेरकी, संजय पडोळे, युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, पवन नीलमवार, सुरेश फुलझले, ललिता ताई फुलझले, डेव्हिड खोब्रागडे, सुजित खोब्रागडे, आकाश दहिवले, संदीप मोहबे, सौरभ वाढई यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्थानिक कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्तम रीतीने पार पाडले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या