Advertisement

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन!


 महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन!

— डॉ. अशोक नेते, माजी खासदार, गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा

गडचिरोली : दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

आज देशभरात आद्यकवि, रामायणाचे रचनाकार आणि मानवतेला सत्याच्या मार्गावर नेणारे तेजस्वी तपस्वी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या पावन दिनानिमित्त माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी महर्षी वाल्मिकींना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले आणि समाजाला सत्य, धर्म व संस्कृतीचे पालन करण्याचे आवाहन केले.

महर्षी वाल्मिकी यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जगाला 'रामायण' सारखा अमूल्य ग्रंथ दिला. श्रीरामाच्या मर्यादेचा, सीतेच्या शौर्याचा आणि धर्माच्या विजयाचा संदेश त्यांच्या ओजस्वी शब्दांतून मानवजातीपर्यंत पोहोचला. त्यांच्या साहित्याने केवळ इतिहास घडविला नाही तर भारतीय संस्कृतीच्या आत्म्याला दिशा दिली.

वनातील कठोर तपश्चर्या आणि साधनेच्या बळावर वाल्मिकींनी सिद्ध करून दाखवले की जीवनात परिवर्तन घडविण्याची खरी शक्ती लेखणीत आणि साधनेत दडलेली आहे. आजही त्यांचा संदेश आपल्याला न्याय, कर्तव्य, करुणा आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो.

या विशेष दिनानिमित्त डॉ. अशोक नेते म्हणाले, “महर्षी वाल्मिकींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आपणही आज संकल्प करू या — सत्य बोलू, धर्माचे रक्षण करू आणि आपल्या संस्कृतीची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवू. त्यांच्या अमर कार्यास कोटी कोटी प्रणाम!”

महर्षी वाल्मिकी जयंतीच्या पावन निमित्ताने दरारा 24 तास न्यूज नेटवर्कच्यावतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

✍️ — दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या