📰 श्री साई पादुका दर्शन सोहळा संपन्न — साईभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग!
गडचिरोली ::✍️ वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क
गडचिरोली नगरीत अत्यंत मंगलमय आणि पवित्र वातावरणात “श्री साई पादुका दर्शन सोहळा” पार पडला. या धार्मिक सोह नाळ्याच्या निमित्ताने हजारो साईभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्री साईनाथ महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
या प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी सर्व साईभक्तांचे मनःपूर्वक स्वागत करताना सांगितले की,
“सद्गुरु श्री साईनाथ महाराज यांच्या कृपाशिर्वादाने प्रत्येक भक्ताच्या जीवनात सुख, समाधान आणि मंगलमयतेचा प्रकाश नांदो, हीच साईचरणी विनम्र प्रार्थना.”
गडचिरोली शहरात झालेल्या या सोहळ्यामुळे भक्तिभावाने ओथंबलेले वातावरण अनुभवायला मिळाले. साईभक्तांनी “ॐ साई राम” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
🌿 श्री साई पादुका दर्शन सोहळा
🙏 भक्ती, श्रद्धा आणि सद्गुरूंच्या कृपाशिर्वादाने गडचिरोलीत संपन्न
📍 वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क

 



 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या
Thanks for reading