*कुरखेडा येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न*
*जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकणार*
(वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे)
गडचिरोली:- (कुरखेडा) सुखसागर झाडे
*कुरखेडा :* वंचित बहुजन आघाडी जिल्हा गडचिरोली च्या वतीने कुरखेडा येथील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सभा आयोजित करण्यात आली. पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी व नवीन कार्यकर्ते पक्षात समाविष्ट करण्यासाठी नवीन व जुने कार्यकर्ते एकत्रित येऊन पक्ष संघटन वाढविण्यासाठी येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच कुरखेडा तालुक्यातील नविन कार्यकारिणी गठित करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे यांनी सभेला संबोधीत करताना म्हटले की, जनसामान्यं नागरिकांना, मतदार बंधू भगीनींना सत्तेत परिवर्तनीय लाट पसरवयाची आहे. जनता सत्ताधारी पक्षाच्या दिल्या जाणाऱ्या थोतांड आमिषाला सतत बळी पडत आहे. आता सत्तेत आमुलाग्र बदल घडवण्याचा लोकांचा कल आहे ते वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने लोकसहभाग तसेच लोक हिताची कामे,मतदारांच्या मनात पक्षाबद्दल आपुलकीचे बिज रूजवायचे आहेत. अशा लोककल्याणकारी योजना तळागाळातील जनसामान्यांना न्याय कसे देता येईल यासाठी कटिबद्ध पद्धतीने काम करावे अशा विविध सुचना पदाधिकारी व कार्यकर्त्याना दिल्या.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ जी दुधे वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष सोनलदिप देवतळे, वंचित बहुजन आघाडी महिला प्रतिनिधी उषाताई निमगडे, युवा कार्यकर्ता पीयुष शेडमाके , ताराचंद नंदेश्वर ,दिनेश राऊत ,किशोर धोंडणे,सदाशिव शेंडे ,मुरलीधर कसारे ,पुणेश वालदे ,हंसराज लाडे,यांची उपस्थिती होती.
ॲड श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीत काम केले पाहिजे.
असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे यांनी केले.

 



 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या
Thanks for reading